Sunday 24 June 2018

बाबराने मशीद बांधलीच नाही !

१९३४ पासून नमाज़ झालीच नाही तर मस्जिद कशी ?

ईसापूर्व १०० वर्ष (100 BC) महाराजा विक्रमादित्य यांचे जेष्ठ बंधू भर्तृहरि ने राज्यत्याग करून संन्यास घेतला होता, गुरु गोरखनाथ महाराज यांचे शिष्य झाले होते ! सम्राट विक्रमादित्य जेव्हा श्रीराम दर्शन करण्यासाठी अयोध्येला आले तेव्हा त्यांनी पाहिलं कि,सर्व उध्वस्त आहे तेव्हा त्यांनी महाराज कुश द्वारा निर्माण केलेली हवेली,तिचा पाया शोधून त्यावर विशाल श्रीराम जन्मस्थान हवेली आणि अन्य ३६० मंदिरांचा पुनरुद्धार केला.त्या मंदिराच्या स्तंभांचा उल्लेख 'वंशीय प्रबंध' तथा 'लोमस रामायण' या ग्रंथात सापडतो.प्रभु श्रीराम यांची श्यामवर्ण मूर्ति होती.या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा राम नवमीच्या पर्वावर उत्सवा सह महाराजा विक्रमादित्य द्वारा झाली होती.

सन १०२६ सोमनाथ मंदिरा वर महमूद गझनवी ने आक्रमण करून मदिर ध्वस्त केले तर त्याचा भाचा सालार मसूद ने १०३२ मध्य अयोध्या आक्रमण केलं ! श्रीराम जन्मस्थान हवेली (मंदिर) ध्वस्त केल्या कारणाने अनेक राजांनी मिळून सालार मसूद ला पळवून लावले.राजा सुहेलदेव पासी ने त्याचा पाठलाग केला नि सिंधौली-सीतापुर मध्ये सालार मसूद चे "पांच सिपह सालार" ठार मारून पुरले, पासी राजा सुहेलदेव मसूदच्या मागावर होता. दिनांक १४ जून १०३३ ला सालार मसूद बहराइच मध्ये ठार मारला गेला,त्याला जिथे पुरले तिथे आता मजार असून दुर्भाग्याने पुत्र प्राप्तीच्या नवसासाठी अनेक हिंदू दर्शनास येतात !

गढ़वाल नरेश गोविन्दचन्द्र शैव (१११४-११५४) यांनी बुध्द मतावलंबी (पूर्व वैष्णव) कुमारदेवी शी विवाह करून भिक्षूंना सहा गावं इनामात दिली.ब्रह्मदेश (म्यानमार) च्या पेगोंग मध्ये महाबोधि प्रतिकृति मंदिर बनवून दिलं.आपले राज प्रतिनिधी- कन्नोज नरेश नयचंद ल ८४ कसोटीचे गढ़वाली शिळा पाठवून अयोध्येत श्रीराम जन्मस्थाना वर विशाल मंदिर निर्माण केलं.ज्याचे प्रमाण १८ जुन १९९२ ला उत्खननांत प्राप्त ३९ अवशेषातील एक २० पंक्ति शिलालेखा वरून दिसून येत !

बाबरा ने आपला शिक्क्यासह,मंदिर सोडण्याचा हुकुमनामा सेनापति मीरबाँकी द्वारा श्री पंच रामानन्दीय निर्मोही आखाड्यास पाठवून ही जेव्हा कब्जा सोडला नाही गेला तेव्हा महंत श्यामानन्द निर्मोही यांचा शिरच्छेद करून मंदिर उखळी तोफा लावून २३ मार्च १५२८ ला तोडलं !

मंदिर पाडुन मशीद बांधत असतां दोन वर्ष युद्ध सुरु होतं ! हंसबर नरेश रणविजयसिंह, महाराणी जयराज कुमारी त्यांचे राजगुरु पं. देवीदीन पाण्डेय यांचे बलिदान मध्य काळात स्वामी महेशानंद साधु सेना घेऊन लढले.पण कथित मशिदीची जेव्हढी भिंत दिवस भरात बांधून होई ती रात्री ढासळून पडत होती.तेव्हा बाबराने हिंदु संतांशी मशवरा केला.तेव्हा साधूंनी भजन-पूजन स्थान निर्माण करण्यास सभागृह बांधण्याचा सल्ला दिला. मिनार बांधले नाहीत,परिक्रमा मार्ग ठेवला.वजू करण्यासाठी हौद बांधला नाही.दारावर हनुमानजी ची मूर्ती लावून सीता पाकस्थान लिहिलं गेलं व छतात चंदन फळ्या टाकल्या !

काही विदेशी यात्रेकरुंनी मंदिराच्या प्रमाण साक्षी नमूद करून ठेवल्या आहेत !

१) ऑस्ट्रेलियन मिशनरी जोसेफ टायफेंथालेर ने १७६६-१७७१ अयोध्या यात्रेहुन परतल्यावर सन १७८५ मध्ये लिहिलेल्या," हिस्ट्री एंड जोग्राफी इंडिया" पृ. २३५-२५४ वर लिहिलेल्या संदर्भानुसार,"बाबराने राम जन्मभूमि स्थित मंदिर उध्वस्त करून मशीद बनवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने उध्वस्त मंदिराच्या ढिगाऱ्यातून सुस्थितीत असलेले ८४ कसोटीच्या १४ स्तंभांचा वापर केला.मुसलमानांशी लढत हिंदु तिथे पूजा-अर्चना करतात व परिसरातील राम चबुतऱ्यावर परिक्रमा केली जाते !"
२) १६०८-१६११ भारत भ्रमणकारी विल्यम फिंच ने लिहिलेल्या,"अर्ली ट्रेवल्स इन इंडिया" पृ. १७६ वर राम फोर्ट-रानि चंड असा उल्लेख सापडतो.
३) गैझेटियर ऑफ़ दी टेरीटरिज अंडर गव्हर्मेंट ऑफ़ इस्ट इंडिया कं. लेखक एडवर्ड थोर्नटन पृ. क्र. ७३९-४० वर सन १८५४ मध्ये लिहितोय कि,"बाबर ने मशिदी साठी मंदिर पाडुन त्याचे ढिगाऱ्यातील १४ स्तम्भ निवडून लावले !"
४) "इनसाय्क्लोपीडिया ऑफ़ इंडिया" १८५७ एडवर्ड बाल्फोअर लिहितो , "राम जन्मस्थान, स्वर गडवार व माता का ठाकुर ३ मंदिर पाडुन मशीद उभी केली."
५) "हिस्टोरिकल स्केच ऑफ़ फ़ैजाबाद" ले.कार्नेजी १८७० मध्ये लिहितो , "राम मंदिरात काळेशे वजनदार स्तंभ होते,त्यांवर सुंदर नक्षीकाम केले होते मंदिर पाडल्यावर ते मशिदी साठी वापरले गेले ! "
६) "गैझिटियर ऑफ़ दी डाविन्स अवध" - १८७७ मध्ये लिहिलंय, बाबर ने १५२८ मध्ये मंदिर पाडुन मशीद बनवली !
७) पर्शियन ग्रंथ "हदीका इ शहादा" ले. मिर्जा जान १८५६ लखनऊ पृ. ७ वर लिहिलंय, "मथुरा, वाराणसी, अयोध्या हिंदु आस्थेशी जोडलेल्या आहेत,त्यांना बाबराच्या आदेशाने तोडून मशिदी बनवल्या आहेत !"
८) ब्रिटिश नियुक्त श्रीराम जन्मभूमि व्यवस्थापक व वाजिद अली शाह चा सेवादार मौलवी अब्दुल करीम ने 'ग़ुमइश्ते हालात इ अयोध्या' मध्ये स्वीकार केलंय कि,मंदिर पाडुन मशिदी बनविल्या !
९) अकबरनामा आइन ए अवध-मध्ये अब्दुल फाजल १५९८ मध्ये अशाच प्रकारे मदिर विध्वंस प्रमाण देतोय !

श्री रामचरित मानसच्या व्यतिरिक्त गोस्वामी तुसलीदास जीं नी रामलला नहछु, वैराग्य संदीपनी, छंदावली रामायण, जानकी मंगल, पार्वती मंगल, श्रीराम सगुणावली, दोहावली, गीतरामायण, कडरवा-रामायण, कृष्ण गीतावली, विनय पत्रिका, हनुमान चालीसा असे अनेक व्रज-अवधी भाषेत अनेक ग्रंथ लिहिलेत जे विश्व विख्यात आहेत.तुसलीदासजी चे 'दोहा शतक' अंतिम चरण श्रीराम जन्मस्थान मंदिर विध्वंस वर्णन आहे !

मंदिर विवादाच्या पृष्ठ भूमि वर ,सन १८५५ अयोध्या नरेश मानसिंह यांच्या सांगण्यावरून वाजिद अली शाह ने श्रीराम जन्मस्थाना वर पुन्हा चबुतऱ्यावर पूजा करण्याची व त्यावर ३ फुट खसच्या चटयांची सावलीची व्यवस्था करुं दिली असे हे वैकल्पिक मंदिर निर्माण केले गेले,पूजा होऊ लागली.आमिर अली ने वाजिद अली व निर्मोही आखाड्याचे बाबा रामचरण दास यांत मध्यस्थता घडवून श्रीराम जन्मस्थाना वर मशीद नसून मंदिर असल्याचा निर्णय घोषित केला.१८५७ क्रांतीचा काळ असल्याने ब्रिटिश सरकार, हिन्दू-मुस्लिम एकता होऊ देऊ इच्छित नव्हते.त्यांनी बाबा रामचरण दास व  आमिर अली ला फाशी देऊन वाजिद अली ला बंदी बनवून लंडन ला धाडलं.ब्रिटिशांनी श्रीराम मंदिर व्यवस्थापन अब्दुल करीम कडे सोपवलं होत व त्याने ही आपल्या पुस्तकात मंदिर स्वीकार केलंय !

ब्रिटिशांनी राजकीय उद्देश्याने मोहमद अजगर ला चिथावणी देऊन श्रीराम जन्मस्थान मंदिर भिंतीत दार बनवून मंदिराच्या मागे मैदानात जाण्याचा रस्ता व नमाज अनुमती मागण्याचा सल्ला दिला. दिनांक १३ डिसेंबर १८७७ ला हा विवाद ब्रिटिश आयुक्त फैजाबाद कडे गेला.श्री पंच रामानंदीय निर्मोही अखाडा महंत श्री खेमदास यांनी विरोध केला परंतु ,ब्रिटिश कूटनीति नुसार मुस्लिम पक्षाच्या बाजून निर्णय देण्यात आला.मंदिराच्या मागील बाजूस जी भिंत उभी केली ती इबादतगाह कशी ? पूर्वे कडे तोंड करून नमाज होत नाही कि त्या बांधलेल्या भिंती कडे पाठ करून ही नमाज पढत नाही म्हणून मंदिराच्या व्हरांढयात पाच-सहा नमाजी येऊन १९३४ पर्यंत नमाज चा रेकॉर्ड बनवून गेले.दिनांक १९ जानेवारी १८८५ फ़ैजाबाद कनिष्ठ न्यायालयात निर्मोही अखाडा महंत श्री रघुबरदास गेले तिथे त्यांची याचिका निरस्त झाली तेव्हा जिल्हा न्यायालयात दिवाणी वाद क्र.१७/१८८५ प्रस्तुत केला ; न्या. कर्नल एम्. इ. ए. चामियार नी राम जन्मस्थान परिसर दौऱ्याची नौटंकी केली व पूर्व निर्णय स्थिर ठेवला.म्हणून पुन्हा १८ मार्च १८८६ ला  कमिश्नर ऑफ़ डिस्ट्रिक्ट कोर्टात निर्मोही आखाड्या ने अभ्यर्थना (अपील) केली. न्या. डब्ल्यू. यंग ने इतिहासात न डोकावता "विवादित स्थल - मस्जिद द जन्मस्थान" अशी नोंद करीत दावा फेटाळला.या घटने नंतर पहिल्यांदा मशिदी चे नाव श्रीराम जन्मभूमी शी जोडले गेले !

१४ जुलै १९४१ फ़ैजाबाद नझुल विभागाने श्रीराम जन्मभूमि मंदिर-परिसर, रामकोट ,अयोध्या ६७.७७ एकर प्लाट क्र. ५८३ असं पंजीकृत करीत वर्णन : तीन गुंबद (कळस) मंदिर, कब्ज़ा श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाडा महंत श्री रामरघुनाथ दास, पुजारी श्री रामसकल दास एवम रामसुभग दास यांच्या नावे नोंद केली आहे.सन १९४४ उ.प्र. गैझेट मध्ये, 'शिया वा सुन्नी मुस्लिम किंवा त्यांच्या १९३६ मध्ये निर्मित वक्फ बोर्ड नी "मस्जिद द जन्मस्थान"च्या देखरेखीत कोणती ही रुची दाखवली नाही !"असं लिहिलंय.

दिनांक २३-२४ डिसेंबर १९४९ स्वा.वीर सावरकर प्रेरणे ने झालेल्या हिन्दू महासभा आंदोलनात मिळालेल्या सफलते नंतर फैजाबाद जिल्हा हिंदु महासभा अध्यक्ष ठाकुर गोपाल सिंह विशारद यांनी हा विवाद ३/१९५० फैज़ाबाद न्यायालयात नेला.
यात १७ राष्ट्रिय मुसलमानांनी कोर्टात शपथ पत्र देत म्हटलंय कि, "हम दिनों इमान से हलफ करते है की, बाबरी मस्जिद वाकई में राम जन्मभूमि है. जिसे शाही हुकमत में शहं शाह बाबर बादशाह हिंद ने तोड़कर बाबरी मस्जिद बनवाई थी. इस पर से हिन्दुओ ने कभी अपना कब्ज़ा नहीं हटाया. बराबर लड़ते रहे और इबादत करते रहे.बाबर शाह बक्खत से लेकर आज तक इसके लिए ७७ बलवे हुए.सन १९३४ से इसमें हम लोगो का जाना इसलिए बंद हो गया की, बलवे में ३ मुसलमान क़त्ल क़र दिए गए और मुकदमे में सभी बरी हो गए. शरियत के मुतालिक भी हम उसमे नमाज नहीं क़र सकते क्यों की इसमें बुत है. इसलिए हम सरकार से अर्ज करते है कि मंदिर हिन्दु ओ को सौप दिया जाए !" ......लिहून देणार वली मुहमद पुत्र हस्नु मु.कटरा; अब्दुल गनी पुत्र अल्लाबक्ष मु.बरगददिया; अब्दुल शफुर पुत्र इदन मु. उर्दू बाजार; अब्दुल रज्जाक पुत्र वजीर मु. राजसदन; अब्दुल सत्तार समशेर खान मु. सय्यदबाड़ा; शकूर पुत्र इदा मु. स्वर्गद्वार; रमजान पुत्र जुम्मन मु. कटरा; होसला पुत्र धिराऊ मु. मातगैंड; महमद गनी पुत्र शरफुद्दीन मु. राजा का अस्तम्बल; अब्दुल खलील पुत्र अब्दुरस्समद मु. टेडीबाजार; मोहमद हुसेन पुत्र बसाऊ मु. मीरापुर डेराबीबी; मोहमद जहां पुत्र हुसेन मु. कटरा; लतीफ़ पुत्र अब्दुल अजीज मु. कटरा; अजीमुल्ला पुत्र रज्जन मु. छोटी देवकाली; मोहमद उमर पुत्र वजीर मु. नौगजी; फिरोज पुत्र बरसाती मु. चौक फ़ैजाबाद; नसीब दास पुत्र जहान मु. सुतहटी राष्ट्रीय प्रवक्ता प्रमोद पंडित जोशी हिंदूमहासभा पक्षकार-रामलला विराजमान