Friday 14 April 2017

श्रीराम सेतू हा भारत भूमीचा भौगोलिक,सामरिक रक्षक


श्रीराम सेतू हा भारत भूमीचा भौगोलिक,सामरिक रक्षक असून सन १८६० पासून २००५ पर्यंत सेतू विषयी १४ अध्ययन समित्या नेमल्या गेल्या होत्या. मात्र त्यांनी कधी रामसेतू तोड्ण्याविषयीचा सल्ला दिला नाही. डॉक्टर पचौरी या समिति वर कार्यरत होते , यांचे प्रस्ताव अमेरिकेच्या हाती विकलेल्या गुलामा अनुरूप आहेत.ह्या परियोजनेला २००३ साली NDA वाजपेयी शासनकाळात गती मिळाली.२६ डिसेंबर २००४ ला आलेलं त्सुनामी वादळ नि त्याचा प्रकोप केवळ रामसेतू मुळे धीमा पडला होता,अर्थात हा सेतू तट रक्षक आहे हे हि सिद्ध झालंय.८ मार्च २००५ ला पंतप्रधान कार्यालयाने तुतीकोरीन पोर्ट ट्रस्ट च्या सेतू प्रोजेक्ट वर १६ आपत्ती दर्शक प्रश्न केले.मात्र,३० जुन ला पोर्ट अध्यक्ष रघुपती यांनी पाठविलेल्या उत्तरावर पंतप्रधान कार्यालयाने कधी ही स्पष्टीकरण देखील मागितले नाही.

तरी सुध्दा,सेतू समुद्रम साठी रामसेतु न तोडता धनुषकोडी-मंडपम च्या दरम्यान भारत-श्रीलंका जोडणारा सेतू बनवला जाऊ शकतो.२३ मार्च १९७६ श्रीलंका-भारत सरकार मध्ये समुद्री जलसंधी झाली आहे ,२३ जून २००५ अमेरिकी नौसेनेने यास आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र म्हणत हि जलसंधी नाकारली होती.तत्कालीन जहाजरानी मंत्री टी.आर.बालू चे  सचिव डी.टी.जोसेफ,डेजिंग कार्पो.इंडिया चे निर्देशक हुसैन अब्दुल रहमान यांनी स्वेझ नहर च्या अधिकार्यांशी मिळून जो सौदा केला नि २ जुलाई २००५ ला यु.पी.ए.अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी ने परियोजने च उद्घाटन केलंय ते अमेरिकी दबावा चेच संकेत होते.२ जुलै २००७ चेन्नई च्या बंदरात अमेरिकी युध्दपोत निमित्झ चे येणे २ ऑक्टोबर २००७ अमेरिके द्वारा शक्तीशाली महिला म्हणून सोनिया गांधी चा गौरव करीत संयुक्त राष्ट्र संघ मंचावर भाषण देण्यास आमंत्रित करणे सर्व संदेह निर्माण करणारे होते.                                                                                                                                                                                  चीनचा पाकिस्तान-ग्वादल ,श्रीलंका,बांग्लादेश बंदरात तसेच अनेक समुद्री बेटांवर,तसेच भूतान-नेपाल-म्यानमार मध्ये सैनिकी तळ उभारण्याचा प्रयत्न म्हणजे विश्वसत्ता बनू पाहणारे खंडित भारताला सामरिक दृष्ट्या घेरण्याचा कार्यक्रम मात्र आहे असे सिद्ध झालंय.अमेरिकेने सेंट गार्शिया मध्ये सैनिकी तळ उभारून हिंदू महासागरात पाय पसरायला कधीच आरंभ केला आहे, कारण अस सांगितले जाते कि,रामसेतु मुळे जो लांबचा वळसा घालावा लागतोय तो,तोडल्याने इंधन आणी वेळेची बचत होईल.यासाठी त्यांनी आपली जलसंधी नाकारत चीन द्वारा चारी बाजूने घेरल्याचा लाभ उचलत आमच्या सामरिक विवशतेचा सहाय्यक बनून विकल्प मांडलाय ? आता अमेरिका व ट्रम्प चे मित्र म्हटले जाणारे मोदी अमेरिकेचे प्यादे बनु नये म्हणजे झाले .

         दुसरी कडे मात्र अशी माहिती पुढे येतेय कि, अमेरिकन संशोधक टेलीसच्या अनुसार,"भारताकडे जगातील सर्वात मोठा थोरियम साठा आहे !" जो रामसेतू च्या निकट आहे.भारताची युरेनियमची कमतरता थोरियम भरून काढेल.त्यातून आण्विक उर्जा प्राप्त होईल असा संकेत प्राप्त झाला तसेच ९ ते १४ जून २००७ इस्तंबूल मध्ये भाभा BARC -मुंबई चे वैज्ञानिक वी.जगन्नाथन यांनी थोरियमच्या सहाय्यतेने आण्विक रीएक्टर विकसित केला असल्याचे प्रतीकात्मक प्रदर्शन जगाला घडविले होते आणि ही माहिती मिळताच रामसेतू तोडल्याने थर्माइड-थोरियम वाहून जाईल आणि भारताला युरेनियम पुरविठ्यासाठी अमेरिके वर अवलंबून राहावे लागेल असे हे षड्यंत्र होते . त्यामुळे लोकसभेत १,२,३ वरून प्रचंड संसदीय तमाशा झाला,सरकार वाचविण्यासाठी मुलायम अधिक मुलायम झाले ? अरुण जेटलीला रोबर्ट ब्लेक ने बोलाविले वगैरे.अमर सिंग ला मोदी सरकार ने आश्रय दिला यातून कुणाला काय निष्कर्ष काढायचे ते काढा !      
नागपूर महाविद्यालय कुलगुरू श्री.चान्सरकर आणि पं.श्री.मदनमोहन शर्मा "शाही" यांच्या लंकेश्वर ग्रंथात विदित वर्णनानुसार, 'श्रीलंका विजय पश्चात अगस्त्य ऋषी यांनी जातांना रावण-कुंभकर्ण-मेघनाद यांची शस्त्रास्त्र शाळा,कोठार-भांडार यांवर अग्निगोळे डागून ते ध्वस्त केले होते .हे सर्व थर्माइड ध्वम्मास्त्र होती.या कच्च्या थर्माइड चे कण रामसेतू निकट समुद्रात पसरलेले मिळतात.हे शुद्धीकरण झाल्यावर थोरियम होते.या खेरीज भारतात ओडिशा मध्ये याच्या खाणी असून त्यांचे प्रचंड प्रमाणात स्मगलिंग झाले आहे.
 आता प्रश्न हिंदू श्रद्धांचा,वैज्ञानिक प्रमाणानुसार रामसेतू चे नकाशे इस्ट इंडिया कं.चे सर्वेअर जेम्स रेनल ने १७८८ मध्ये बनविले.त्यानुसार रामानकोइल आणि तलाईमन्नार च्या मध्ये जोडणारा सन १४०८ पर्यंत पायी श्रीलंका नेणारा  समुद्री रस्ता " रामार सेतू " अश्या नावाने अंकित आहे.सन १८०४ मध्ये बनविलेली प्रतिलिपी रामार सेतू ला " आदम्स ब्रिज " नोंद करते.सदर दस्तावेज तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात सुरक्षित आहे.श्रीराम सेतू तोडणे हाच उद्देश ठेवून सरकार प्रयत्नशील असतांना डाव्या पक्षांची राम सेतू ला पाठींबा देण्याची भुमिका हि चीन पुरस्कृत नि अमेरिका विरोधी असली तरी द्रविडी राजकारण हे राम विरोधी का ? तर शैवांचा वैष्णवांना सुरु असलेला पुरातन विरोध आणि प्रचंड फंड्स DMK ला अमेरिकेने दिले होते..
देशात श्रीराम जन्म स्थानास बाबराचा कलंक लाऊन मंदिर पाडणाऱ्यांचे सरकार स्थानापन्न आहे,अमर सिंग ला सुरक्षा पुरवली आहे . अश्या मोदी सरकार वर हिंदू किंवा श्रीराम भक्त किती विश्वास ठेवतात ?