Sunday 7 October 2018

श्रीराम जन्मस्थान जमीन ६७:७७ एकर ही कुणाची ?

श्रीराम जन्मस्थान संपुर्ण जगातील सनातनी लोकांचे दैवत ,संविधान अधिष्ठान त्यांचे जन्मस्थान मुक्त व्हावे व विशाल मंदिर पुनर्निर्माण व्हावे ही तो श्रीं ची इच्छा आहे !
परंतु श्रेयाचे राजकारण नि अर्थकारण यामुळे विलंब !
श्रीराम जन्मस्थान जमीन ६७:७७ एकर ही कुणाची ?
यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे
श्रीराम जन्मस्थान विषयी संत -माहात्म्यांना पुढे करून किंवा आपले अस्तित्व राखू पाहणाऱ्या संतांनी एखाद्या राजकीय पक्षास आर्थिक लालूच दाखवून ज्या घोषणा सुरु केल्यात ते पाहिल्यावर किती ढोंगी राजकारणी व किती फसवे हिंदुत्व घेऊन मतदार किंवा श्रीराम भक्त भुलवले जात आहेत हे सहज लक्षात यावं यासाठी हा लेखन प्रपंच !
ठाणे जिल्ह्यातील हिंदू श्री मलंग गड वा दुर्गाडी किल्ला या आंदोलनाचे काय राजकारण सुरु आहे हे जाणत असतील ! अशी अपेक्षा !
त्यात श्रीराम जन्मस्थान मंदिर आंदोलन घोषणा दसऱ्याला होणार ?
जागृत श्रीराम भक्तांनी विषय समजुन घेतला तर राजकारण विरहित हिंदूंची संयुक्त शक्ती श्रीराम मंदिर पुन्हा उभारणी साठी कामास येईल !
आता मुख्य मुद्दा

श्रीराम जन्मभूमी २३ मार्च १५२८ ला कब्ज्यात घेण्यासाठी बाबराने मीर बांकी च्या हस्ते हुकूमनामा श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्यास पाठवला . महंत श्यामानंद यांनी श्रीराम जन्मस्थान कब्जा सोडण्यास नकार दिल्याने त्यांची हत्या करून मंदिर उखळी तोफा लावून पाडले .
या ठिकाणी मस्जिद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला .मंदिर विध्वंस केल्या नंतर त्याच ढिगाऱ्यातून १४ स्तंभावर हि वास्तू उभारली जात असतांना
दिवस भर झालेले बांधकाम रात्रीतून धराशायी होत होते व दुसरी कडे युद्ध ही सुरु होते .
अखेर बाबराने श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्याच्या संतांना बोलावून समस्या समाधान विचारले . त्यानुसार मिनार बांधले नाहीत ,वजू करण्यासाठी हौद बांधला नाही. महात्म्यांनी सांगितल्या प्रमाणे संतांना भजन-किर्तनासाठी सभागृह बांधले. परिक्रमा मार्ग ठेवून चंदन लाकुड वापरून सीता पाकस्थान लिहिले आता या ढिगाऱ्यातील स्तंभांवर असलेल्या दैवतांचे पूजन श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाडा महात्मे करू लागले . तोपर्यंत दोन वर्ष युद्धात एक लक्ष बहात्तर सहस्त्र लोक धरणीवर पडले .असे ७७ वेळा लढून श्रीराम जन्मस्थान श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्यास सोपविले गेले . 
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेरणेने उत्तर प्रदेश हिंदू महासभा अध्यक्ष ब्रह्मलीन महंत दिग्विजयनाथ यांच्या नेतृत्वात फैजाबाद हिंदू महासभा अध्यक्ष ठाकूर गोपालसिंग विशारद यांच्या न्यायालयीन नेतृत्वात मंदिर कलंकमुक्त झाले व २६ डिसेंबर १९४९ ला कुरकीं झालेल्या मंदिरात पूजेसाठी ४ पुजाऱरी सरकारी वेतनाने नेमून दोनशे गज मंदिर परिसरात गैरहिंदू प्रवेश प्रतिबंध घातला गेला .
१९६२ साली सुन्नी वक्फ ने हाशिम अंसारी च्या पुढाकारात प्रथम च याचिका टाकली . हिंदू महासभेने ठेवलेल्या मुर्त्या काढून नमाज साठी अनुमती मागितली . १९६५ साली अपिलात ही हिंदू महासभा जिंकली .नंतर प्रोफेसर लाल च्या नेतृत्वात उत्खनन हिंदू महासभेच्या मागणीनुसार झाले . आता पर्यंत मिळालेले सर्व पुरावे साक्ष श्रीराम मंदिर असल्याचे सांगते .
सर्वोच्च न्यायालयाने २०१६ हिंदू महासभेच्या मागणीनुसार मध्यस्थता स्विकारली,घोषित केलं .
जुलै २०१७ हिंदू महासभेच्या पुढाकारात निर्मोही आखाडा व सुन्नी वक्फ चे दावेदार यांत झालेल्या बैठकीत श्रीराम जन्मस्थान मंदिर परिसर बाऊंड्रीवाल सहमती झाली . ४ ऑगस्ट २०१७ पक्षकारांनी पंतप्रधान कार्यालयास पत्र पाठवून भेटीची वेळ मागितली . ती न मिळाल्याने श्री श्री रविशंकर यांनी मध्यस्थता करण्याचा प्रस्ताव दिला नि चर्चा सुरु होताच सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी मानस व्यक्त केला .
माननीय न्यायालयाने,श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्याच्या १८८५ पासून सुरु असलेल्या सिवील सूट नुसार हा विवाद धार्मिक नसून भूमी स्वामित्वाचा असल्याचे घोषित करून सुनावणी आरंभली आहे .
अश्या परीस्थितीत श्रीराम मंदिर समर्थकांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्या सोबत उभे राहून बळ द्यायचे कि विवाद चिघळवायचा नि सुनावणी लांबवावी ?


श्रीराम मंदिर राजकीय व भोंदू संधीसाधू यांच्या मुळे २०१० नंतर सुनावणीस आले नाही . हिंदू महासभेच्या प्रयत्नांना मिळालेल्या अराजकीय यशात सर्वांनी पुढाकार घेऊन श्रीराम जन्मभूमी स्वामित्व ओळखून मंदिर मार्ग प्रशस्त करावा.
जय जय रघुवीर समर्थ !
प्रसिद्धी साठी
दासानुदास प्रमोद पंडित जोशी pramod.hindu71@gmail.com

No comments:

Post a Comment